भुसावळात अग्निशमन प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा
भुसावळ (21 ऑगस्ट 2024) : राष्ट्रीय छात्रसेना व मेजर इन्स्टिटयूट ऑफ फायर अॅण्ड सेफ्टी भुसावळद्वार शनिवार, 17 ऑगस्ट रोजी होमगार्ड, तसेच सुशिक्षित बेरोजगार आणि अग्निशमन आणि सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा अधिकारी या विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी प्रात्यक्षिकांसह कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी विविध स्वयंरोजगाराच्या व व्यवसायाच्या संधीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ, इन्स्टिट्यूट ऑफ फायर अॅण्ड सेफ्टीचे प्राचार्य संजय खेडकर, नाहाटा महाविद्यालयाचे एनसीसीचे दीपक पाटील, स्मिता चौधरी, अर्जुना संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर पंड्या, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक सतीश कांबळे, रवींद्र पाटील, करणसिंग रावळ, अनिल भिंगाने, अक्षय राजनकर उपस्थित होते. या कार्यशाळेत, विद्यार्थ्यांना अग्निशमन करतांना घ्यायची दक्षता, प्रयत्न आगीच्या ठिकाणी अडकल्यास स्वतःला आणि इतरांना कशा पद्धतीने सुरक्षित ठिकाणी हालवावे व आपला व इतरांचा जीव वाचवावा याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

