भुसावळातील पर्यावरण मित्र नाना पाटील यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर


भुसावळ (21 ऑगस्ट 2024) : भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षक नाना शंकर पाटील यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक 2024 पुरस्कार जाहीर झाला आहे. कै.महेंद्र तिवारी फाऊंडेशन, झाशी या संस्थेने मूलभूत शिक्षणाच्या शाळांमध्ये सकारात्मक कार्य आणि नाविण्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक क्षितीजावरील ध्रुव तारेसारखे असणार्‍या उत्कृष्ट अशा देशातील 51 शिक्षकांची निवड केली आहे.

झाशी येथे पुरस्कराचे वितरण
विविध सामाजिक, नैसर्गिक, शैक्षणिक नवोपक्रम, उत्कृष्ट अध्यापन तसेच शाळा बाह्य विद्यार्थिनींना शिक्षण प्रवाहात आणणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचन वाढावे यासाठी स्पर्धात्मक परीक्षा सहभाग वाढविणे , विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांची उत्तम शैक्षणिक कामगिरी या आधारावर नाना पाटील यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रविवार, 25 ऑगस्ट रोजी शासकीय संग्रहालय, झाशी येथे नाविण्यपूर्ण शिक्षण आणि ई-कंटेंट तयार करण्यासाठी हा सन्मान केला जाणार आहे. विविध मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती, असेल, असे स्व.महेंद्र तिवारी फाउंडेशन झाशीचे संचालक मृत्युंजय तिवारी साधना तिवारी, डॉ.अचल सिंह यांनी कळविले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !