शेअर मार्केटमध्ये घातला नऊ लाखांचा गंडा : भुसावळच्या तरुणाला भोपाळ क्राईम ब्रँचकडून अटक


Bhopal crime branch arrested a youth from Bhusawal for swindling 9 lakhs in the stock market भुसावळ (22 ऑगस्ट 2024) : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळेल, असे भासवून भोपाळच्या तक्रारदाराची तब्बल नऊ लाख 35 हजारात फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीताचा शोध सुरू असताना तो सावदा शहरातील नातेवाईकांकडे आल्याची माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलिसांच्या सहकार्याने त्यास अटक करण्यात आली. अनिकेत दत्तात्रय बर्‍हाटे (27, रा.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

9 लाख 35 हजारांची फसवणूक
मध्यप्रदेशातील भोपाळ येथे एकाची शेअर मार्केटमध्ये नऊ लाख 35 हजारांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भोपाळ क्राईम ब्रँचने संशयीताचा सहभाग शोधून काढला मात्र संशयीत सावद्यात नातेवाईकांकडे लपल्याने सावदा पोलिसांची मदत घेण्यात आली. आरोपीला अटक केल्यानंतर पथक त्यास भोपाळ येथे घेवून गेले. आरोपीने भामट्यांना बँकेत खाते उघडून दिल्याने ही कारवाई झाल्याचे समजते. ही कारवाई सावदा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार हवालदार उमेश पाटील, हवालदार यशवंत टहाकळे, कॉन्स्टेबल राजेंद्र वैदकर, भोपाळ क्राइम ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक साहू, हवालदार सेन, शिपाई शर्मा, शिपाई चौरे यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !