धारकुंड धारेश्वरला धबधब्याखाली अंघोळ करताना पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू


Dharkund Dhareshwar, a young man died after his foot slipped while bathing under the waterfall सोयगाव (28 ऑगस्ट 2024) : धारेश्वर (धारकुंड) येथील धबधब्याखाली अंघोळ करत असताना पाय घसरून कुंडात पडल्याने एका तरुण भाविकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 26 रोजी दुपारी एक वाजता घडली. गजानन राघु माने (35, रा.केर्‍हाळा, ता.सिल्लोड) असे मयताचे आहे.

अचानक घसरला पाय
श्रावण सोमवारनिमित्ताने मृत भाविक दर्शनासाठी आला पण दर्शना आधीच त्याचा कुंडात बुडून मृत्यू झाला. वाडीसुतांडा गावापासून सहा की.मी अंतरावर धारकुंड धारेश्वर महादेवाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. अत्यंत घनदाट जंगलात हे धार्मिक स्थळ आहे. पायवाटद्वारे येथे भक्तगण मोठ्या प्रमाणावर येतात. श्रावण महिन्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. श्रावण सोमवार असल्याने सिल्लोड तालुक्यातील केर्‍हाळा येथील गजानन माने व चार ते पाच मित्रांसोबत धारकुंड धारेश्वर येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते येथे आल्यावर तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा खाली अंघोळ करण्यासाठी गजानन व मित्र गेले असता गजाननचा पाय घसरला व तेथील मोठ्या कुंडात जावुन पडला.

केर्‍हाला गावावर शोककळा
कुंडास मोठ-मोठ्या कपारी असल्याने गजानन पाण्यात दिसला नाही. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक रज्जाक शेख, जमादार संदीप सुसर, राजेंद्र बर्डे, विकास दुबेले घटनास्थळी पोहोचले. काही पट्टेदार पोहणार्‍यांनी सायंकाळी पाच वाजता गजानन मानेचा मृतदेह बाहेर काढला. मृत गजाननच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. गजानन माने हा वाहन चालवून उदरनिर्वाह करत होता त्यामुळे सिल्लोड परिसरात तो परिचित होता. केर्‍हाला गावात त्याच्या मृत्यूची बातमी वार्‍या सारखी पसरताच गावात शोककळा पसरली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !