जळगाव जिल्ह्यातील तीन गुन्हेगार स्थानबध्द


Three criminals arrested in Jalgaon district जळगाव (28 ऑगस्ट 2024) : जळगाव एमआयडीसी, यावल पोलीस स्टेशन आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना नागपूर आणि मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जळगव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत.

या संशयीतांविरोधात कारवाई
जळगाव शहरातील आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (24, रा.तुकाराम वाडी, जळगाव) यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश मधुकर बिर्‍हाडे (22, रा.सिद्धार्थ नगर, यावल) याच्यावर 10 वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे (28, रा.पाडळसाा ता.यावल) याच्यावर तब्बल 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तिघांवर यापूर्वी पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. परंतू तिघांमध्ये कोणत्याची प्रकारची सुधारणा होत नव्हती. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी त्यांच्यावर अंकूश लावण्यासाठी एमपीडीए कायद्यांर्गत कारवाई करत स्थानबध्द करण्यात यावे, असा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला. त्यानुसार तिघांच्या प्रस्तावाचे अवलोकन करून मंजूरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता प्रस्तावाला मंजूरी दिली.

तिघे कारागृहात स्थानबद्ध
रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर याला नागपूर कारागृहात तर आकाश बिर्‍हाडे आणि प्रवीण उर्फ डॉन तायडे या दोघांना मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. त्यानुसार संबंधित पोलीस प्रशासनाने कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !