लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार ; जळगावच्या तरुणाविरोधात गुन्हा
Abuse of a young woman with the lure of marriage; Crime against youth of Jalgaon धुळे (28 ऑगस्ट 2024) : देवपुरातील एका अपार्टमेंटमध्ये तरुणाने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावच्या तरुणाविरोधात गुन्हा
पीडितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून 7 मार्च 2024 पासून संशयित आरोपी जयेश खूमासिंग ठाकुर (38 रा.नर्मदेश्वर महादेव मंदिराजवळ, रासयोनी नगर, जळगाव) या संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून देवपुरातील एका अपार्टमेंटमध्ये अत्याचार केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत.