जळगावात कुंटणखान्यावर छापा : पाच पीडीतांची सुटका
एमआयडीसी पोलिसांची कारवाई : दोघांविरोधात गुन्हा दाखल
Raid on Kuntankhana in Jalgaon : Five victims rescued जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी शहरातील एका हॉटेल व लॉजिंगवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकत पाच पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी हॉटेलचे मालक-चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने अवैधरित्या व्यवसाय चालवणार्यांच्या गोटात खळबळ उडाली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेल्या सागर हॉटेल व लॉज येथे बेकायदेशीर पध्दतीने कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार मंगळवार, 27 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता छापा टाकला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेलचे मालक सागर नारायण सोनवणे (रा.जळगाव) आणि चालक सागर सुधाकर पाटील या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक विकास सातदिवे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा तेली, हवालदार मुकुंदा पाटील, रामदास कुंभार, विनोद भास्कर, भरत डोके यांच्यासह इतरांनी केली आहे. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहे.
