भुसावळात स्व.मुकेश यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली


भुसावळ (29 ऑगस्ट 2024)  : शहरातील वंशिका प्रतिष्ठानतर्फे भारतीय संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध गायक स्व.मुकेश यांच्या पुण्यतिथीनिमित्त सरस्वती नगरात श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला. डी.एस.बर्डे यांनी दीपप्रज्वलन केले. असंख्य गाण्यांमधून आपल्या आवाजातली जादू दाखवून हिंदी सिनेसृष्टीतील गायकांपैकी सर्वश्रेष्ठ गायकांच्या यादीत मुकेश यांचे नाव घेतलं जाते मात्र 27 ऑगस्ट 1976 रोजी आवाजाच्या जादूगराचं निधन झालं मात्र आवाजाच्या रुपातून मुकेश आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.

स्वरांमधून वाहिली श्रद्धांजली
वंशिका प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहातील अनेक कलाकारांनी गीत गाऊन स्व.मुकेश यांना स्वरांमधून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी विवेक नरवाडे, संभाजी सोनवणे, अखिलेश कुमार, हेमंत खरात, गांधेले, रोहित अडकमोल, संतोष मेश्राम, डी.एस.बर्डे, आकाश व्यास, रियाज खान, सुनील चौधरी तसेच असंख्य नागरीक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !