श्री जैन श्वेतांबर खान्देश तेरापंथी सभेच्या अध्यक्षपदी रवींद्र निमाणी


Rabindra Nimani as President of Sri Jain Shwetambar Khandesh Terapanthi Sabha भुसावळ (30 ऑगस्ट 2024) : शहरातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र लालचंदजी निमाणी यांची श्री जैन श्वेतांबर खान्देश तेरापंथी सभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. साध्वीश्री प्रबलयशानी यांच्या उपस्थितीत अणुव्रत भवन, जळगाव येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड झाली. निवडीचे पत्र वर्तमान मंत्री सुरजमल सूर्या यांनी वाचवून दाखविले.

अशी आहे नूतन कार्यकारीणी
अध्यक्ष रवींद्र लालचंदजी निमाणी (भुसावळ), उपाध्यक्ष प्रथम सुरेशचंद जवरीलाल लोढा (मनमाड), उपाध्यक्ष द्वितीय राजकुमार भिकमचंद सेठिया (जळगाव), मंत्री प्रदीप इंदरसिंग मुणोत (दोंडाईचा), कोषाध्यक्ष वर्धमान भवरलाल बेदमुथा (धुळे) यांची निवड करण्यात आली आहे.

आयामाचे प्रचार-प्रसार करणार
संपूर्ण खानदेशात चातुर्मासार्थ अथवा परिसरात विचरत असलेल्या साधू-साध्वी यांचा संपूर्ण सार-संभाळ करणे, सर्व सभा, उपसभा यांचा सांभाळ करणे, महासभेकडून आलेल्या प्रत्येक कार्याची माहिती सर्व सभांना देणे व त्यांच्याकडुन कार्य करुण घेणे, तसेच महासभेच्या सर्व योजनांची माहिती देऊन त्यासंदर्भात कार्य करणे. वर्षातून एकदा गुरुदर्शनासाठी साधीक रुपाने सर्वांना घेऊन जाणे.आदी कार्याची जबाबदारी निमाणी यांच्यावर राहिल. निमाणी यांच्या कार्यक्षेत्रात मध्यप्रदेशातील खंडवा बर्‍हाणपूरपासून थेट नाशिक ईगतपूरीपर्यंत तर मुक्ताईनगरपासून गुजरात सीमेपर्यंतचा भाग येतो. महासभेचे विशेष आयाम अणुव्रत, प्रेसाध्यान, जीवन-विज्ञान, समण-संस्कृती संकाय या सारख्या आयामाचे प्रचार-प्रसार करु, असे यावेळी नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र निमाणी यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !