जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी : एक गंभीर
Clash between inmates in Jalgaon District Jail : A serious one जळगाव (30 ऑगस्ट 2024) : विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या जळगाव कारागृह आता पुन्हा कैद्यांच्या हाणामारीमुळे चर्चेत आले आहे. बंदीवान असलेल्या कैद्यांमध्ये कुठल्यातरी कारणावरून तुफान हाणामारी झाली. ही घटना शुक्रवार, 30 ऑगस्ट रोजी 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला तर इतर किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
जुन्या वादातून तुंबळ हाणामारी
जळगाव जिल्हा कारागृह बॅरिकेट क्रमांक 1 ते 4 आणि 9 ते 12 येथे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात दाखल असलेले कैदी यांच्यात जुना वाद उफाळून आला. दोन गटात सुरुवातीला किरकोळ वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर दोन गटात हाणामारी होऊन तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकमध्ये सचिन सोमनाथ गायकवाड (30, रा.सबजेल जळगाव) हा बंदीवान कैदी जखमी झाला तर इतर किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावीत, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यासह जिल्हा कारागृहात दाखल झाले आहेत.
