विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला: गलवाडा गावातील घटना
Dead body of married woman found in well: incident in Galwada village सोयगाव (30 ऑगस्ट 2024) : माहेरी आलेल्या विवाहितेचा मृतदेह गुरुवारी दुपारी एक वाजता विहिरीत आढळून आला. ही घटना गलवाडा येथे उघडकीस आली. याप्रकरणी सोयगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. शालिनी धर्मराज सुरवाडे (28, खांडवे, ता.जामनेर, जि.जळगाव) असे विहिरीत मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
विहिरीत आढळला मृतदेह
सासरहुन शालिनी सुरवाडे ही विवाहिता माहेरी आली होती. बुधवारी पहाटे ती घरातून निघून बेपत्ता झाली होती. तिच्या आईने सोयगाव पोलीस ठाण्यात विवाहिता हरवल्याची नोंद बुधवारी केली मात्र त्या महिलेचा मृतदेह गुरुवारी सुनसवाडी शिवारात विहिरीत तरंगताना आढळून आला. याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

विवाहितेच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे..पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे, अजय कोळी, दिलीप पवार आदी पुढील तपास करत आहे.
