जळगावात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : आरोपीला मुंबईत बेड्या


Abuse of a minor girl in Jalgaon : Accused in chains in Mumbai जळगाव (30 ऑगस्ट 2024) : जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन बालिकेवर नराधम प्रौढाने अत्याचार केल्याने समाजमन संतप्त झाले आहे. आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली.

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार
रामानंद पोलीस स्टेशन हद्दीत संशयित आरोपी सिद्धार्थ वानखेडे (40) याच्या घराजवळ मुले लपंडावचा खेळ खेळत होती. अकरा वर्षाची अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घरात लपाछपी खेळतांना लपायला गेली असता आरोपीने घराचा दरवाजा बंद करून बालिकेवर अत्याचार केला. ही घटना 12 ऑगस्ट रोजी दुपारी चार ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.

मुंबईहून आरोपीला अटक
मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपीने मुलीचे तोंड दाबून जीव ठार मारण्याची धमकी दिली. काही दिवसानंतर मुलीच्या आई -वडिलांना या घटनेबाबत कळल्यानंतर त्यांनी तत्काळ धाव घेत बुधवार, 28 रोजी रामानंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी सिद्धार्थ वानखेडे हा मुंबईला पळून गेल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पथकाने गुरुवारी त्यास मुंबईवरून अटक केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !