सावद्यात मोठा मारुती मूर्ती संवर्धन प्रकिया : सात क्विंटल शेंदूर काढला
सावदा (30 ऑगस्ट 2024) : सावदा शहरातील गांधी चौक परिसरातील मोठा मारुती येथील मूर्तीची संवर्धन प्रकिया नुकतीच करण्यात आली. तब्बल 725 किलो शेंदूराचे पुरातन आजपर्यंत न काढण्यात आलेले हे कवच काढण्यात आल्याने मारुतीरायांचे अतिप्राचीन मूर्तीचे स्वरूप समोर आले.

ही संवर्धन प्रक्रिया पार पडल्यानंतर 27 ऑगस्ट रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. यावेळी सकाळी पूजा, अभिषेक करण्यात आला. यानंतर प्रसादाचे वाटपदेखील करण्यात आले. यावेळी येथे भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला. यशस्वीतेसाठी गांधी चौक मित्र मंडळाने परिश्रम घेतले.
