फैजपूर शहरात पथ विक्रेता समितीची बिनविरोध निवड
फैजपूर (30 ऑगस्ट 2024) : फैजपूर नगरपरिषदेच्या पथविक्रेता समितीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीत आठ जागांसाठी दहा अर्ज दाखल झाले मात्र एक अर्ज अवैध ठरला तर नऊ वैध नामनिर्देशन पत्रातून दोन अर्ज माघारी घेण्यासाठी प्राप्त झाल्याने उर्वरित सात जागांसाठी प्रत्येक प्रवर्गात एक अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला राखीव असलेल्या एक पदासाठी कोणतेही नामनिर्देशन प्राप्त झाले नाही.
असे आहे बिनविरोध उमेदवार
रहिमुद्दिन जहुरोद्दीन (अल्पसंख्यांक प्रवर्ग), मलक आदिल-मलक गफार (दिव्यांग प्रवर्ग), चारुलता संजय मेंढे (अनुसूचित जाती महिला राखीव), परवीन बानो फिरोज खान (सर्वसाधारण महिला राखीव), शमीम बानो शेख सुलतान कुरेशी (इतर मागासवर्ग), अतुल अशोक कापडे (सर्वसाधारण प्रवर्ग), जलील खान शफी खान (सर्वसाधारण प्रवर्ग). निवडणूक निर्णय अधिकारी तथा शेंदुर्णीचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाजीराव नवले, कार्यालयीन अधीक्षक माधव कुटे, सहा.प्रकल्प अधिकारी संगीता बाक्षे, प्रवीण सपकाळे यांच्याहस्ते उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले.

