जळगावच्या तांबापुरा भागात घरफोडी : 70 हजारांचा ऐवज चोरीला


जळगाव (30 ऑगस्ट 2024) : घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून चोरट्यांनी पडतीवर स्टिलच्या डब्यात ठेवलेली रोकड तसेच सोन्याचे दागिने मिळून सुमारे 70 हजारांचा मुद्देमाल लांबवला. 17 ऑगस्ट ते सोमवार, 26 ऑगस्टदरम्यान ही घटना तांबापुरा बिस्मिल्ला चौकात घडली. या प्रकरणी बुधवार, 28 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
शमीम बानो खुतुबोद्दीन शेख (50, रा.बिस्मिल्ला चौक, तांबापुरा) या महिला वास्तव्यास आहेत. त्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेवले. त्यानंतर हा डबा पडतीवर ठेवला. त्यानंतर शनिवार, 17 रोजी सायंकाळी 5.30 वाजता घराच्या दरवाजाला कुलूप लावून गावी गेल्या.
चोरट्यांनी कडी कोयंडा तोडत त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर पडदीवरील डबा उतरविला. 50 हजारांची रोकड तसेच 20 हजार किंमतीचे कानातील सोन्याच्या रिंग घेऊन चोरटे पसार झाले.

घटना कळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी भेट दिली. तपास हवालदार रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !