महाजनको स्थानिक कंत्राटदार संघटना अध्यक्षपदी उल्हास बोरोले
भुसावळ (31 ऑगस्ट 2024) : भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील महानिर्मितीच्या स्थानिक कंत्राटदार संघटनेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी उल्हास बोरोले त उपाध्यक्षपदी दीपक हातोले तर कार्याध्यक्षपदी मधु इंगळे यांची निवड करण्यात आली.
अन्य सदस्यांमध्ये महेश पीठले, ईरफान सय्यद, अरुण पाटील, राहुल निंबाळकर, गणेश सुर्यवंशी, मनीष सुरवाडे, विजय तायडे, मेंबर दुर्गेश कोलते, बालाजी पठाडे, निलेश काबळे, बब्बूसिंग भावेश चौधरी, विजय भालेराव, निशान निकम, प्रवीण पाटील, दीपक वाढे, सलमान पठाण, शाहरूख पठाण, पप्पू कोळी यांचा समावेश आहे.




