पलवल रेल्वे स्थानकावरील ब्लॉक पुढे ढकलला : गौंडवाना, पठाणकोट नियमित धावणार
Palwal railway station block postponed: Goundwana, Pathankot will run regularly भुसावळ (1 सप्टेंबर 2024) : उत्तर रेल्वेमधील पलवल स्टेशनवर पलवल ते न्यू प्रिथला यार्ड येथे कनेक्टिव्हिटी करण्यासाठी आणि नॉन इंटरलॉकिंग कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आला होता मात्र तो आता स्थगित करण्यात आला आहे. ब्लॉकच्या काळात रद्द करण्यात आलेल्या गौडवाना व पठाणकोट एक्स्प्रेस या गाड्या व मार्ग बदल केलेल्या रेल्वे गाड्या या आता पूर्वत्व धावणार आहे.
उत्तर रेल्वेमधील पलवल स्टेशन येथे नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकच्या कामामुळे भुसावळ विभागातून धावणार्या प्रवासी गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला तर चार गाड्या रद्द करण्यात आल्या मात्र ब्लॉकच रद्द करण्यात आल्याने मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस, अमृतसर-मुंबई पठाणकोट एक्सप्रेस, भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस नियमितरित्या पूर्वीच्याच मार्गावरून धावणार आहे. अन्य मार्ग बदल झालेल्या रेल्वे गाड्या सुध्दा वेळेवर धावणार आहे.

या गाड्यांच्या मार्गात परिवर्तन
पलवल येथील ब्लॉकच्या काळात मार्ग बदल केलेल्या मुंबई-फिरोजपूर, फिरोजपूर-मुंबई एक्स्प्रेस, एर्नाकुलम हजतर निजामुद्दीन एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दिन एर्नाकुलम एक्स्प्रेस, वास्को दि गामा हजतर निजामुद्दिन एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दिन वास्को दि गामा एक्स्प्रेस या गाड्या आता पूर्वीच्याच मार्गाने धावणार आहे.
