भुसावळातील सेंट पॉल स्कूलमध्ये लेट्स हॅव फन विथ अॅनिमल महोत्सव
भुसावळ (2 सप्टेंबर 2024) : साकरी फाट्याजवळील सेंट पॉल स्कूलमध्ये लेट्स हॅव फन विथ अॅनिमल कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रजातीचे प्राणी पशू व पक्षी यांची वेशभूषा धारण करून पशु व प्राण्यांचे महत्त्व याबद्दल जनजागृती केली.
विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा पाहून पालक वर्गही दंग झाला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रुबिया शेफर्ड, सुपरवायझर जेनिफर गायकवाड तसेच शाळेतील शिक्षक वर्ग कर्मचारी व विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

