बोदवड शहरात श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम


बोदवड (2 सप्टेंबर 2024)  : नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोदवड शहरात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संतोष कुंवर होते. नाभिक समाजाचे बोदवड तालुकाध्यक्ष धनराज शेळके यांनी सपत्नीक संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा-आरती केली.

समाजातील गुणवंतांचा सत्कार
बोदवड तालुक्यातील नाभिक समाजाचे विद्यार्थी जयेश प्रकाश बाभुळकर, प्रणाली विवेक वखरे, तिलक राजेंद्र बिडके या गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, हर्षल बडगुजर, विजय पालवे, कैलास चौधरी, किरण वंजारी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, सचिन राजपूत, निलेश पाटील, नगरसेवक संजय गायकवाड, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक विजय बडगुजर, माजी नगरसेवक गोपाळ खेवलकर, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस संजय काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष निवृत्ती ढोले, संभाजी ब्रिगेडचे अनंत वाघ, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष शैलेश वराडे, रवी बावस्कर, दीपक आहुजा, नानक आहुजा, प्रभाकर पाटील आदींची उपस्थिती होती. संजय वाघ, संतोष कुंवर, राजेंद्र डापसे, विवेक वखरे, अमोल आमोदकर, गणेश सोनोने, गजानन भोंडेकर, राजेंद्र शेळके, संजय बिडके, सारंगधर डापसे, रितेश बिडके, सोपान महाले, गजानन पर्वते, किशोर डापसे, ज्ञानेश्वर डापसे, राजेंद्र बिडके, प्रकाश बाभुळकर, निवास बाभुळकर, राजेंद्र बाभुळकर, कैलास बाभुळकर, गोपाळ डापसे, राजेंद्र वर्मा, संतोष वसाने, वासुदेव वसाने, गोपाळ वखरे, योगेश वखरे, शरद बोरनारे, गणेश बोरनारे, संतोष गलबले, भगवान बोरसे, दिलीप बोरनारे, शुभम अंबुस्कर, शंकर आंबुस्कर, राहुल अंबुस्कर, ईश्वर वाशिमकर, संतोष कळमकर व अनेक समाजबांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !