पोळा सणालाच वाघझिर्यातील शेतकर्याचा खदानीत बुडाल्याने मृत्यू
बैलांना अंघोळ घालताना दुर्घटना : गावात शोककळा
A farmer in Waghjira died due to drowning in a quarry on Pola festival itself यावल (2 सप्टेंबर 2024) : सर्वत्र पोळा सणाचा उत्साह असताना वाघझिरा, ता.यावल येथील शेतकर्याचा मात्र बैलांची अंघोळ करण्यासाठी गेल्यानंतर खदानीत बुडाल्याने मृत्यू झाला. सोमवार, 2 रोजी सकाळी ही दुर्घटना घडली. राजू नबाब तडवी (40, वाघझिरा, ता.यावल) असे मयताचे नाव आहे. यावल पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली.
यावल पोलिसात नोंद
राजू तडवी हे सोमवार, 2 सप्टेंबर पोळ्याच्या दिवशी वाघझिरा शिवारातील चैनसिंग खजान बारेला यांच्या शेतामधील खदानीत त्यांच्याकडील बैलांची अंघोळ करण्यासाठी घेवून गेले होते मात्र खदानीत बैलांना हाकलून बाहेर काढत असतांना त्यांचा पाय घसरला व ते खदानीत बुडाले. स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढत यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र अधिकार्यांनी तपासणी करीत मृत घोषीत केले. याबाबत मयत राजु तडवी यांचे मामा अकबर बाबु तडवी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

