भुसावळ तालुका अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे मेजर ध्यानचंद जयंती उत्साहात
भुसावळ (3 सप्टेंबर 2024) : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ तालुका असोसिएशनतर्फे अटल गार्डन येथे मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व अॅथलेटिक्स विविध खेळात प्राविण्य मिळालेल्या खेळाडूंचा सत्कार राहुल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून श्रेयस इंगळे व विशाल जंगले होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
भुसावळ तालुका असोसिएशन द्वारा शॉर्ट पुट ऑल इंडिया वेस्ट झोन प्लेयर सुजल शुक्ला, स्टेट लेवल थाळीफेक प्लेयर गौरी लोहार यांच्यासमवेत प्रसाद सोनवणे, आदित्य मराठे, प्रसाद शर्मा या खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील यांनी निरोगी व सुरक्षित आयुष्यासाठी झाडे लावण्याचे आवाहन केले. रमण भोळे यांनी मार्गदर्शन केले. असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत निकम, सचिव रवींद्र चोपडे, कार्यकारी सचिव गोपीसिंग राजपूत, योगेंद्र हरणे, ट्रेनर ममता जांगीड, ट्रेनर इरफान शेख, किरण पाटील, राकेश शर्मा, दिगंबर कुबडी, डोंगरसिंग महाजन आदींची उपस्थिती होती.

