भुसावळातील जय गणेश फाउंडेशनच्या नवसाच्या गणपतीचे भूमिपूजन


भुसावळ (3 सप्टेंबर 2024) : शहरातील जय गणेश फाउंडेशनच्या सुरभी नगरातील नवसाच्या गणपतीच्या सभामंडपाचे भूमिपूजन नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांच्याहस्ते करण्यात आले. गत 17 वर्षांपासून जय गणेश फाऊंडेशनच्या नवसाच्या गणपतीची स्थापना होते. दरवर्षी संपूर्ण गणेशोत्सवात 10 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मराठमोळ्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. भारतातील विविध मंदिरांच्या भव्य प्रतिकृतीची आरास करण्यात येते.

यंदा भव्य आरास
यंदा भव्य आरास बनवण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले. यावेळी समन्वयक गणेश फेगडे, सचिव तुकाराम आटाळे, तुषार झांबरे, राहुल भावसेकर, निलेश कोलते, नचिकेत यावलकर, रवि जोनवाल, कृष्णा मराठे, प्रभाकर चौधरी, अभिषेक वाणी,ए. व्ही. चौधरी, प्रविण पाटील आदी पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !