जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत तिघांना सर्पदंश
जळगाव (4 सप्टेंबर 2024) : वेगवेगळ्या घटनेत सापाने दंश केल्याने तीन जणांना विषबाधा झाली. तिघांना मंगळवार, 3 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. बाधितांमध्ये उल्हास बाविस्कर (35, रा.पिंपरखेड), मन्साराम पूर्ण नाव माहित नाही (35), प्रियंका समाधान सोनवणे (19, रा.चुनवाडे, ता.रावेर) यांचा समावेश आहे. तिघांवर उपचार सुरू आहेत.
शिरसोली शिवारात प्राण्याकडून म्हशीच्या पारडूचा फडशा
जळगाव : शिरसोली शेत-शिवारात हिंस्त्र प्राण्याचा वावर असल्याचा प्रकार समोर आला आहे. नायगाव शिवारात गोठ्यामध्ये म्हशीच्या पारडूवर हल्ला केल्याने मृत्यू झाला. मंगळवार, 3 रोजी ही घटना उघडकीस आली.
रघुनाथ रामदास माळी (रा. शिरसोली) यांच्याकडे म्हशीसह पाळीव असे 21 गुरे आहेत. शेतातील गोठ्यात त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. मध्यरात्रीनंतर हिंस्त्र प्राण्याने गोठ्यात शिरकाव करत म्हशीच्या पारडूचा फरशा पाडला. या घटनेमुळे परिसरात भिती निर्माण झाली