धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तलवारींसह चॉपर बाळगणार्या दोघांना अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन आरोपींना अटक
Dhule Crime Branch’s big operation: Two arrested for carrying choppers with swords धुळे (4 सप्टेंबर 2024) : दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आणलेल्या चार तलवारींसह एक चॉपर धुळे गुन्हे शाखेने शंभर फुटी रोड भागातील दोन संशयीतांकडून जप्त केला आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. समीर सलीम खाटीक (19) व अयान अबर मणियार (19, शंभर फुटी रोड, अलहेरा हायस्कूलजवळ, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना संशयीतांकडे तलवारींचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने पथकाला त्यांनी 4 सप्टेंबर रोजी कारवाईचे निर्देश दिले. सुमैय्या हॉलजवळून संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून चार हजार रुपये किंमतीच्या चार तलवारी व पाचशे रुपये किंमतीचा एक चॉपर जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, हवालदार पंकज खैरमोडे, हवालदार प्रशांत चौधरी, हवालदार हर्षल चौधरी, कॉन्स्टेबल जगदीश सूर्यवंशी, कॉन्स्टेबल मयूर पाटील आदींच्या पथकाने केली.