दिड लाखांचे लाच प्रकरण : जळगाव बीएचआरच्या अवसायकासह वसुली अधिकार्‍याची कोठडीत रवानगी

0

One and a half lakh bribe case : Jalgaon BHR official along with recovery officer sent to custody जळगाव (4 सप्टेंबर 2024) : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जळगावातील अवसायकासह वसुली अधिकार्‍याला दिड लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक एसीबीने जळगावातील मुख्य कार्यालयातच मंगळवारी सायंकाळी अटक केली होती. संशयीतांना बुधवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपींच्या घर झडतीत काहीही सापडले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लाच स्वीकारताच अटक
43 वर्षीय तक्रारदाराच्या कुटूबिंयांचे कर्ज सेटल करण्यासाठी अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे (57, मूळ राहणार 25, आश्रय अपार्टमेंट, फ्लॅट नंबर एक व तीन, पंचशील वाचनालयाजवळ, गांधीनगर, नागपूर) व वसुली अधिकारी सुनील गोपीचंद पाटील (54, रा.डी 20, सुकृती पिनॅकल अपार्टमेंट,गुजराल पेट्रोल पंप जवळ, जळगाव) यांनी दिड लाखांची लाच मंगळवारी सायंकाळी स्वीकारली होती. आरोपींना बुधवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली मात्र त्यात काहीही आढळले नाही. या गुन्ह्याचा तपास एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे करीत आहेत.


कॉपी करू नका.