रावेरसह फैजपूर, यावल भागातील इलेक्ट्रीक पोलवरील तार चोरी करणार्‍या टोळीला अटक

जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : 44 गुन्ह्यांची उकल : साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

0

A gang was arrested for stealing wires from electric poles in Faizpur, Yawal areas along with Raver भुसावळ (4 सप्टेंबर 2024) : रावेरसह निंभोरा, फैजपूर, यावल भागातील शेतांमधील इलेक्ट्रीक पोलवरील विद्युत तार चोरी करणार्‍या परप्रांतीय टोळीला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींच्या अटकेनंतर तब्बल 44 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून तीन लाख 52 हजार 642 रुपये किंमतीचे अ‍ॅल्युमिनिअम इलेक्ट्रीक तार जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी रावेराच्या भंगार व्यावसायीकास चोरीचा मुद्देमाल विक्री केल्यानंतर त्यासही आरोपी करण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर व यावल तालुक्यात सातत्याने वीज तारांची चोरी होत असल्याने शेतकरी हैराण झाले होते. पोलीस अधीक्षकांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचा आदेश दिल्यानंतर जळगाव गुन्हे निरीक्षक बबन आव्हाड यांना चोरट्यांबाबत माहिती मिळाली. सुरूवातीला नूरा केरसिंग मोरे (35, झिरपांझर्‍या, ता.धूलकोट, जि.बर्‍हाणपूर) अनिल भेरसिंग मंडले (26, तितराण्या, ता.धूलकोट, जि.बर्‍हाणपूर) यांना अटक केल्यानंतर त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल रावेरचा भंगार व्यापारी यासीन खान हुसेन खान (42, उटखेडा रोड, रावेर) यास विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली. आरोपीकडून तीन लाख 52 हजार 642 रुपये किंमतीची 29 हजार 803 मीटर अ‍ॅल्युमिनिअम इलेक्ट्रीक तार जप्त करण्यात आली तसेच आरोपी नूरा मोरेची दोन लाखांची चारचाकी (एम.पी.68 झेडसी 2546) ही जप्त करण्यात आली. दरम्यान, आरोपी नूरा मोरेचा शालक अनिल भेरसिंग मंडले, संजू चमार वास्कले (परचुड्या, मध्यप्रदेश), दिना मोरे, सावन उर्फ पंडू मोरे (दोघे रा.निलीखाडी मध्यप्रदेश) यांचाही गुन्ह्यात सहभाग असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

44 गुन्ह्यांची उकल
आरोपींच्या अटकेनंतर रावेर पोलीस ठाणे हद्दीत 22, यावल हद्दीत 14 तर निंभोरा, ता.रावेर हद्दीतील चार व फैजपूर हद्दीतील चार गुन्ह्यांची उकल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपींना अधिक कारवाईसाठी रावेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी आवळल्या टोळीच्या मुसक्या
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीखक अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, महेश महाजन, नितीन बावीस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रमोद ठाकुर
आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


कॉपी करू नका.