भुसावळात तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त : तीन आरोपींना अटक
बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई : कारवाईने शहरात खळबळ
Three lakh fake notes seized in Bhusawal: Three accused arrested भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकूटांच्या टोळीला गोपनीय माहितीच्या आधारे बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून सुमारे तीन लाख रुपये किंमतीच्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. बुधवार, 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता झालेल्या या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मोटांची मोजणी सुरू होती तर आरोपींच्या नावांबाबतही खातरजमा केली जात होती.