एक लाखांच्या मोबदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा : भुसावळात जळगावसह रावेरच्या तिघांना बेड्या
बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई : कारवाईने शहरात खळबळ
Fake notes of 3 lakhs in exchange of 1 lakh: Three of Raver arrested in Bhusawal along with Jalgaon भुसावळ (4 सप्टेंबर 2024) : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकूटांच्या टोळीला गोपनीय माहितीच्या आधारे बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून सुमारे तीन लाख रुपये किंमतीच्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. बुधवार, 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता झालेल्या या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना शहरात काही संशयीत बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने पथकाने बनावट ग्राहक तयार करण्यात आला. संशयीत एक लाख खर्या नोटांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याने पोलिसांनी पूर्ण तयारी केली. बुधवारी सायंकाळी संशयीतांनी तीन ठिकाणे बदलल्यानंतर एका ठिकाणी त्यांनी व्यवहार पूर्ण केला व त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अटक केली.
या आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये सय्यद मुशाईद अली मुमताज अली (38, रा.उस्तानिया पार्क, शिवाजीनगर, जळगाव), नदीम खान रहीन खान (35, रा.सुभाष चौक, शनिपेठ, जळगाव), अब्दुल हकीम अब्दुल कागल (57, रसलपुर रोड, अब्दुल हमीद चौक, रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक राजू सांगळे, प्रशांत परदेशी, जीवन कापडे, निलेश चौधरी, योगेश माळी आदींच्या पथकाने केली.