चार शेतकर्यांचा विद्युत शॉक बसताच मृत्यू
Four farmers died of electric shock चंद्रपूर (11 सप्टेंबर 2024) : चंद्रपूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विद्युत वाहक तारांचा स्पर्श होताच चार शेतकर्यांचा दुर्दैवी मृतयू झाला.ऐन गणेशोत्सवात ही घटना चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) गावात घडली
स्पर्श होताच शेतकर्यांचा मृत्यू
गणेशपूर (मेंडकी) येथील काही शेतकरी बुधवारी सकाळी एका शेतात काम करत असताना सकाळी 11 च्या सुमारास त्यांचा स्पर्श जिवंत वीजवाहक तारांना झाला. त्यात चार शेतकर्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. जखमींवर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत अशी या घटनेत बळी गेलेल्या शेतकर्यांची नावे आहेत. मृतांपैकी 3 शेतकरी गणेशपूरचे आहेत, तर एक शेतकरी चिचखेडचा रहिवासी आहे.

ही घटना रानडुक्करांच्या बंदोबस्तासाठी शेतीच्या कुंपणात सोडलेल्या वीजवाहक तारांमुळे घडली किंवा काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिस त्या अंगानेही या घटनेची चौकशी करत आहेत.
