कोथळी कृषी विद्यालयासमोर अनोळखी तरुणाचा अपघाती मृत्यू


मुक्ताईनगर (14 सप्टेंबर 2024) : कुठल्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 25 ते 30 वर्ष वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 28 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री साडेआठ वाजता घडला होता.

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केल्यानंतर गुरवारी रात्री याप्रकरणी कॉन्स्टेबल दीपक कैलास ढाकरे यांच्या फिर्यादीवरून अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धात्रक करीत आहेत.


कॉपी करू नका.