भुसावळातील 36 शाळांमधील 15 हजार विद्यार्थ्यांना गुड, बॅडटच प्रशिक्षण

भुसावळातील रोटरी रेलसिटी, स्त्रीरोग तज्ज्ञ असोसिएनचा उपक्रम


भुसावळ (25 सप्टेंबर 2024) : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी आणि भुसावळ स्त्रीरोग तज्ज्ञ असोसिएशनतर्फे शहरातील विविश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणीव स्पर्शाची हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे सोमवार, 23 रोजी आहिल्यादेवी कन्या शाळेच्या सभागृहात उद्घाटन करण्यात आले. मंगळवारपासून सलग सात दिवस 30 सप्टेंबरपर्यंत 36 शाळांमधील 15 हजार विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टचबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्य व देशात काही दिवसांपासून बदलापूरसारख्या घटना सातत्याने घडत आहे. अप्रिय प्रकार रोखण्यासाठी याबाबत जनजागृती, लैंगिक शिक्षण आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन भुसावळ स्त्री रोग तज्ज्ञ असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे आयोजित ‘जाणीव स्पर्शांची’हा प्रोजेक्ट राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

36 शाळांमध्ये जनजागृती
भुसावळातील एकूण 36 शाळांमधील जवळपास 15 हजार विद्यार्थी विद्यार्थिनींना 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षित केले जाणार आहे. या प्रोजेक्टचा उद्घाटन समारंभ सोमवारी अहिल्यादेवी कन्या शाळेच्या सभागृहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे उपस्थित होते. भुसावळ स्त्री रोग तज्ज्ञ असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.मनीषा दावलभक्त यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरीचे अध्यक्ष विशाल शाह, प्रकल्प प्रमुख श्रीकांत जोशी यांनी केले आहे.


कॉपी करू नका.