पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे : भुसावळ तहसीलदार निता लबडे
भुसावळ (26 सप्टेंबर 2024) : पालकांनी मुलांनाही समजून घेणे आवश्यक असल्याचे मत भुसावळ तहसीलदार निता लबडे यांनी व्यक्त केले. पालक व पाल्य यातील संभाषण कसे असावे यावर त्यांनी प्रकाश टाकला. भारत विकास परिषद, भुसावळ शाखेच्या वतीने राष्ट्रीय समुहगान आणि भारत को जानो या प्रश्नमंजुषा अशा दोन स्पर्धा प्रभाकर हॉलमध्ये झाल्या.
यांची होती उपस्थिती
उद्घाटन राधेश्याम लाहोटी, गिरीश हिरोडकर, योगेश मांडे, सतीश खडायते, डॉ.छाया चौधरी, कपिल मेहता, श्याम दरगड, चेतन पाटील, रमाकांत भालेराव यांच्याहस्ते झाले. दीपिका हिंगवे यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. उज्वल सराफ यांनी प्रास्ताविक केले. समुहगान स्पर्धेत एकूण 15 शाळांनी तर भारत को जानों स्पर्धेत एकूण 15 शाळांनी आपला सहभाग नोंदवला. शाखा पालक नीलिमा नेहेते, गिरीश हिरोडकर, छाया चौधरी, योगेश मांडे, तहसीलदार निता लबडे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
या शाळांनी मिळवले स्पर्धेत यश
समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक के.नारखेडे विद्यालय (सरदार वल्लभभाई पटेल संघ), द्वितीय क्रमांक तापी पब्लिक स्कूल (वीर सावरकर संघ) व तृतीय क्रमांक विवेकानंद विद्या मंदिर (स्वामी विवेकानंद संघ) ने प्राप्त केला. भारत को जानो या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक कोटेचा हायस्कूल (हरगोविंद खुराणा संघ), द्वितीय क्रमांक ताप्ती पब्लिक स्कूल (आर्यभट्ट संघ), तृतीय आदर्श हायस्कूल (जगदीशचंद्र बोस संघ) तर लहान गटात प्रथम आदर्श हायस्कूल (अमर्त्य सेन संघ), द्वितीय वर्ल्ड स्कूल (श्रीनिवास रामानुजन संघ), तृतीय क्रमांक डॉ.उल्हास पाटील स्कूल (जयंत नारळीकर संघ) यांना प्राप्त झाला. स्मृतीचिन्ह आणि रोख पारितोषिक वितरित करण्यात आले. या दोन्ही स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे संघ 29 रोजी धुळे येथे होणार्या प्रांत स्तरीय स्पर्धेत सहभागी होतील. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार सतीश खडायते यांनी केले. डॉ.नीलिमा नेहेते, सतीश खडायते, हरीष कोल्हे, विलास फालक, कपिल मेहता, श्याम दरगड, डॉ.छाया चौधरी, राधा चव्हाण, विशाल अग्रवाल, सुनील इंगळे, हरीश कोल्हे, अर्चना खानापूरकर, भूषण वैद्य, गौरव हिंगाव, कुणाल महाजन, श्रीकांत जोशी, आनंद फडके, राजेश लढ्ढा, संजय लाहोटी, प्रदीप फिरके, विधी मेहता, दीपक इंगळे, वंदना खडायते, दीपिका हिंगवे, पल्लवी इंगळे, नेहा दरगड, वंदना खडायते, यांनी परिश्रम घेतले.