घरगुती गॅसच्या अवैध धंद्यावर शिरसोलीत एलसीबीचा छापा : पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
LCB raid on illegal business of domestic gas : Rs 5 lakh seized जळगाव (30 सप्टेंबर 2024) : वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरमधून गॅसचा भरणा केला जात असताना एलसीबीच्या पथकाने शिरसोली येथे फिरवित कारवाई केली. भारत, एचपी व इंडीयन कंपनीचे असे 73 घरगुती गॅसचे सिलेंडर, अॅपेरिक्षा, गॅस भरण्याची मशीन असा सुमारे 5 लाख 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मलिकनगर शिरसोली येथील सादीक सिराज पिंजारी (41) हा राहत्या घराच्या कपाऊंडमध्ये मोकळ्या जागेत त्याच्या अॅपे रिक्षामध्ये गॅस सिलेंडरचा साठा करत होता. त्यानंतर अन्य वाहनामध्ये हा घरगुती गॅस मशीनच्या सहाय्याने भरत होता. या अवैध धंद्याची गोपनीय माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याच्या घराकडे मोर्चा वळविला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, एएसआय अतुल वंजारी, अधिकार पाटील, विजय पाटील, हरीलाल पाटील, प्रदीप चवरे, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे, शुध्द्ोधन ढवळे यांनी ही कारवाई केली. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत.