फैजपूर शहराबाहेर 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला
यावल (01 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील फैजपूर शहराबाहेर रावेर रस्त्यावर एका हॉटेलसमोर सोमवारी सकाळी एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. या तरुण भिक्षुक असल्याचे सांगण्यात आले. पंचनामा करून मृतदेह यावल रुग्णालयात आणण्यात आला व येथे शवविच्छेदन करण्यात आले. राहुल रतन लोंडे (22) असे मयताचे नाव आहे. हा तरुण उतारकरू होता व भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत होता.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमजद खान पठाण, ज्ञानेश्वर चौधरी हे दाखल झाले. मृतदेह यावल नेण्याकरीता फैजपूरचे माजी नगरसेवक केतन किरंगे यांनी वाहनाची व्यवस्था करून दिली. यावल रुग्णालयात डॉप्रशांत जावळे यांची शवविच्छेदन केले. फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या तरुणाचा मृत्यू कसा झाला ? हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.