जळगावात 21 वर्षीय विवाहितेवर अत्याचार : एकाविरोधात गुन्हा
Abuse of 21-year-old married woman in Jalgaon : Crime against one जळगाव (01 ऑक्टोबर 2024) : झोपडीत पाणी घेण्यासाठी गेलेल्या शहरातील एका भागातील 21 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडली. याप्रकरणी सोमवार, 30 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
जळगाव शहरातील एका भागात 21 वर्षीय विवाहिता ही आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संशयित आरोपी सुभाष चव्हाण रा.श्याम नगर, जळगाव यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून पीडीता पाणी भरण्यासाठी झोपडीत गेल्यानंतर आरोपी सुभाष चव्हाण याने विवाहितेला ओढत तिच्या पतीला ठार मारेल म्हणून धमकावत तिच्यावर अत्याचार केला. पीडीतेने आरडाओरड केली असता विवाहितेचा पती यांनी दरवाजा लोटून आत आला व त्यावेळी संशयित आरोपीने पीडीतेचा गळा दाबून तिला ढकलून देत पळ काढला.
21 वर्षीय विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात सोमवार, 30 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुभाष चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दमोदरे हे करीत आहे.