सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात
आई मनुदेवीला जलाभिषेकानंतर पिवळा शालू परिधान : राज्यभरातील भाविकांची गर्दी

Sharadiya Navratri festival begins at Ai Manudevi temple, a resident of Satpuda यावल (04 ऑक्टोबर 2024) : सातपुड्याच्या कुशीतील श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. दोन दाम्पत्याच्या हस्ते येथे घटस्थापना करण्यात आली. श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात गुरूवारी शारदीय नवरात्रोत्सवास सुरवात झाली. नवरात्रीचा पहिला दिवस रंग पिवळा असून आई मनुदेवीला जल अभिषेक करून पिवळा शालू परिधान करण्यात आला. घटस्थापनेचा मान आडगाव येथील मनुदेवी माध्यमिक विद्यालयाचे लिपिक महेंद्र पाटील व ज्योती महेंद्र पाटील तसेच संस्थेचे संचालक सुनील महाजन व कांचन महाजन या दोन दाम्पत्यास देण्यात आला. त्यांच्याहस्ते घटस्थापना करण्यात आली.
रोशनाईने उजळले मंदिर
संपूर्ण धार्मिक विधी, पूजा झाल्यानंतर देवीची आरती पूजारी स्वानंद धर्माधिकारी व कुंदन धर्माधिकारी यांच्याहस्ते पार पडली. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, शिवाजी पाटील, नितीन पाटील, सोपान वाणी, ज्ञानेश्वर पाटीलसह सर्व संचालकांची उपस्थिती होती. संस्थेने या नवरात्र उत्सवात नवीन फुलांची सजावट नवीन रोशन करीत मंदिर सजविले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक दुकानदारांनीही आपले दुकाने थाटली आहे तर पहिल्या दिवशी येथे सकाळपासून दर्शनार्थ गर्दी झाली. मंदिर संस्थानकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल भाविकांनी मनुदेवी संस्थेचे आभार मानले. मंदिरासह मानापुरीपासुन ते मंदिरापर्यंत रस्त्यावर पोलीस प्रशासन, वनविभाग आरोग्य विभाग यांचे पथक ठिकठिकाणी थांबुन होते तर पहिल्या दिवशी यावल आगाराकडून विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात आली.
