पुणे हादरले : मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी केला अत्याचार


Pune shook : A girl who went for a walk with a friend was assaulted by three people पुणे (03 ऑक्टोबर 2024) :  बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींनी आधी मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

अत्याचारानंतर आरोपींनी काढला पळ
पीडित तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली असता तिघे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून त्या तरुणीचे आणि मित्राचे फोटो काढले. यानंतर त्या तिघांनी तरुणीला कारमध्ये बसवून कार येवलेवाडीजवळ घेऊन गेले. या ठिकाणी तरुणीवर अत्याचार केले. यानंतर आरोपींनी तरुणीला खडी मशीन चौकात सोडून पसार झाले.

सामूहिक अत्याचार : समाजमन सुन्न
संबंधित पीडित मुलगी ही मुळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणारा आहे. दोघे पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. गुरुवारी रात्रीदोघे दुचाकीवर बोपदेव घाटात ठिकाणी फिरायला गेले होते. त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.


कॉपी करू नका.