यावल तहसीलमध्ये : संगायोच्या बैठकीत 423 प्रकरणांना मंजुरी

यावल (12 ऑक्टोंबर 2024) : यावल तहसील कार्यालयात संजय निराधार समितीची बैठक तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये 875 प्रकरण ठेवण्यात आली व त्यातील 423 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. काही त्रृटी असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित अर्जदारांना त्रृटी पूर्ततेसाठी पत्रव्यवहार केला जात आहे. यावल तहसील कार्यालयात संजय निराधार योजना विभागातर्फे प्राप्त झालेल्या विविध योजने संदर्भातील अर्जांचा निपटारा करण्याकरीता तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी बैठक घोण्यात आली.
423 प्रकरणे मंजूर
संजय निराधार योजना समितीच्या या बैठकीसमोर एकूण 875 प्रकरण ठेवण्यात आले होते. तेव्हा सदर प्रकरणांची तपासणी संजय गांधी योजना विभागाचे नायब तहसीलदार मनोज खारे, वैशाली पाटील, सकावत तडवी, प्रदीप मुंद्रे यांच्या वतीने करण्यात आली. तर यातील 423 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. तर 339 प्रकरण नामंजूर ठरवण्यात आले आहे. तसेच 113 प्रकरणांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत. म्हणून आता या सर्व 113 अर्जदारांना हर्षा कांबळे, भूषण सोनार यांच्यावतीने त्रुटी पूर्ततेसाठीचा पत्रव्यवहार करण्याच्या सुचना तहसिलदारांनी दिल्या आहे. संजय गांधी निराधार योजना समिती नसल्यामुळे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालीच प्राप्त अर्जांचा निपटारा केल्यामुळे अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
त्रुटी पूर्ततेसाठी पत्रव्यवहार.
संजय निराधार योजनेच्या लाभाकरिता तालुक्यातून प्राप्त झालेल्या 875 अर्जापैकी 113 अर्जांमध्ये काही किरकोळ त्रुट्या आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर सदर प्रकरण मंजूर होतील. म्हणून या सर्व त्रुट्या असलेल्या 113 अर्जदारांना त्या त्या गावातील तलाठ्यांमार्फत पत्रव्यवहार केला जाऊन तलाठ्या मार्फतच त्रुटींची पूर्तता स्वीकारली जाणार आहे. व नंतर सदर प्रकरण देखील मंजूर होतील असे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले.-पुर्ण-फोटो आहे

