भुसावळातील विश्वज्योती मंडळातर्फे नारी शक्तीचा सन्मान


Honoring Nari Shakti by Vishwajyoti Mandal in Bhusawal भुसावळ (13 ऑक्टोंबर 2024) : शहरातील राम मंदिर वॉर्डातील विश्वज्योती मंडळातर्फे शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘तेजस्विनी 2024’ पुरस्कार देवून नुकताच सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, वैशाली महाजन, मेघा वाणी, मधुलता शर्मा मान्यवरांची उपस्थिती होती.

या रणरागिणींचा झाला सन्मान
सन्मानार्थी महिलांमध्ये सिस्टर सिल्विना (सिस्टर रोजमेरी सेंट अलॉयसिस स्कूल, भुसावळ), मधुलता द्वारकाप्रसाद शर्मा, वैशाली किरण महाजन, मेघा देवेंद्र वाणी, चारुलता रमाकांत भालेराव, चारू रमाकांत भालेराव, कल्याणी ओक, डॉ.वंदना वाकचौरे, आरती चौधरी, अयोध्याबाई मंत्री, डॉ.ममता जैन , मेघा वैष्णव, स्वाती सराफ, मंगला पाटील, सुमन मल्होत्रा, नेहा दरगड, जयश्री चौधरी, सुनीता पाटील, सुवर्णा वायकोळे, शुभांगी वायकोळे, राजश्री देशमुख, सुनीता जोशी यांचा समावेश आहे. यशस्वीतेसाठी विश्व ज्योती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !