भुसावळ रेल्वे स्थानकावर परळीतील कुविख्यात गुन्हेगाराला बेड्या : नऊ जिवंत काडतूसासह पिस्टल जप्त
रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांची संयुक्त कामगिरी
A pistol with nine live cartridges recovered from a notorious criminal in Parli in Bhusawal भुसावळ (14 ऑक्टोबर 2024): भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई परळी (बीड) येथील 31 वर्षीय तरुणाला नऊ जिवंत काडतूस व गावठी पिस्टलासह अटक केली. ही कारवाई रविवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली. प्रकाश आकाश मुंडे (31) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. संशयीताविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लगेच तपासणाना आढळले पिस्टल
भुसावळ रेल्वे स्थानकावरील साऊथ बाजूकडील मुसाफिर खान्यात असलेल्या लगेज स्कॅनर मशीनमध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजता संशयीताची बॅग तपासणी केल्यानंतर यंत्रणेला सिग्नल मिळताच संशयीताला ताब्यात घेण्यात आले व पंचांसमक्ष बॅगची तपासणी केली असता त्यात एक गावठी पिस्तूल व 9 जिवंत काडतुसे आढळली.

पुण्यात जाणार होता संशयीत
रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी.आर.मीना व लोहमार्गचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणली. रात्री उशिरा संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताकडे पुणे प्रवासाचे जनरल तिकीट आढळले असून पोलिसांकडून याबाबत माहिती काढली जात आहे. काही दिवसांपूर्वीच लगेच स्कॅनरमध्ये तपासणीदरम्यान गांजा आढळवला होता व त्यानंतर आता पिस्टल आढळल्याने खळबळ उडाली..
