पुरनाड फाट्यावर उड्डाणपुलाऐवजी होणार जंक्शन ! : मंत्री रक्षा खडसेंनी घेतला आढावा


Junction will be instead of flyover on Purnad Phata! : Minister Raksha Khadse reviewed मुक्ताईनगर (14 ऑक्टोबर 2024) : इंदोर-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) रा.मा.753 एल रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी पहूर-देशगांव ह्या खंड अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाटा येथे प्रस्तावित उड्डाणपूल ऐवजी स्थानिक रोजगार लक्षात घेता जंक्शन करण्याची मागणी स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यापार्‍यांनी केली आहे. रविवारी त्या संदर्भात मंत्री रक्षा खडसे यांनी त्यांच्या कोथळी (मुक्ताईनगर) येथील निवासस्थानी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकारी व संबंधित नागरिकांची बैठक घेत चर्चा केली व योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांची नाराजी दूर होणार
जमीन संपादनात कमी दराने पैसे मिळाल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये नाराजी असल्याने त्यांच्या समस्या जाणून घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तत्काळ पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांना जोडणार्‍या इंदोर-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) रा.मा.753एल रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भारतमाला योजनेंतर्गत 784 कोटी निधी केंद्र सरकारकडून मंजूर झाला आहे मात्र पुरनाड फाटा येथे उड्डाणपुलाला विरोध असल्याने तेथे जंक्शनची मागणी करण्यात आली असून त्या संदर्भात रविवारी आढावा घेण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !