भुसावळातील 175 मंडळांतर्फे मोठ्या उत्साहात दुर्गा विसर्जन


भुसावळ (14 ऑक्टोबर 2024)  : शहरातील 175 सार्वजनिक दुर्गा मंडळांतर्फे रविवारी देवीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत 45 दुर्गा मंडळे होती मात्र त्यापैकी सहा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी विसर्जन मिरवणूकीत सहभाग न घेता परस्पर वाघूर धरणावर विसर्जन केले. विसर्जन मिरवणुकीत 39 मंडळांचा समावेश होता. ही मिरवणूक रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होती.

39 मंडळांचा मिरवणुकीत सहभाग
शहरातील नृसिंह मंदीरापासून दुर्गा विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. पहिले राजस्थानी दुर्गोत्सव मंडळ निघाले व नृसिह मंदिरापासूनच दुर्गा विसर्जन मंडळांच्या वाहनाला पोलीस प्रशासनाकडून नंबर वितरीत करण्यात आले. शहरात 175 मंडळांतर्फे दुर्गा स्थापना केली होती. मिरवणूकीत 45 मंडळांचा सहभाग होता, मात्र, त्यातील सुध्दा सहा मंडळांनी परस्पर विसर्जन केले तर मुख्य मिरवणुकीत 39 मंडळे होती. विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर पालिका व पोलीस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली. दरम्यान, दुपारी एक नंतर वरणगावरोडवरील पंधरा बंगला भागातील एसटी डेपोत स्थलांतरीत करण्यात आले तर मुख्य मिरवणूक मार्गावर नृसिंह मंदिर ते स्टेशन रोडवरील अमर स्टोअर्सपर्यतच्या मार्गाला जोडले जाणारे 14 उपरस्ते रविवारी बॅरेकेट लावून बंद करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !