रावेर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन


रावेर (14 ऑक्टोबर 2024) :  शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन करण्यात आले व पथसंचलन करून उत्सव साजरा करण्यात आला. सौ.कमलाबाई गर्ल्स हायस्कूल, जिमखाना हॉलमध्ये संघाच्या उत्सवाला शस्त्रपूजनाने सुरुवात झाली.

यांचा पथसंचलनात समावेश
तालुका संघचालक अ‍ॅड.भास्कर निळे, उत्सवाचे प्रमुख पाहुणे डॉ.दत्तप्रसाद दलाल, उत्सवाचे प्रमुख वक्ते देवगिरी प्रांत प्रचारक स्वप्नील चामणीकर यांनी शस्त्रपूजन केले. उत्सवाचे प्रमुख पाहुणे डॉ. दत्तप्रसाद दलाल यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते प्रांत प्रचारक स्वनिल चामणीकर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

रावेर शहरातील येथील सरदार जी.जी हायस्कूल येथून संचलनाची सुरुवात होऊन डॉ.आंबेडकर चौक, डॉ. हेडगेवार चौक, राजा अग्रसेन चौक, चावडी, थडाचा मारुती, मरिमाता मंदिर, राजे शिवाजी महाराज चौक, कारागीर नगर, भोईवाडा, महात्मा गांधी चौक, अंबिका व्यायाम शाळा या मार्गाने पुन्हा शाळेतच संचलन समाप्ती करण्यात आली. एकूण 66 गावातून गणवेशधारी एकूण 350 स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. यावेळी पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, तुषार पाटील आणि सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !