रावेरात निवडणूक प्रक्रियेचा जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा

स्ट्राँग रूमची पाहणी : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यंत्रणेला सूचना


Review of Rawera election process by Collector रावेर (22 ऑक्टोबर 2024) : रावेर विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून मंगळवार, 22 पासून निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रावेर तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन स्ट्राँग रूमची पाहणी केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार बी.ए. कापसे, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक कामकाजाची तसेच स्ट्रॉग रूमची पाहणी करीत कार्यालयातील प्रत्येक टेबलची पाहणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, आचारसंहिता, तक्रार, संनियंत्रण कक्ष, निवडणूक खर्च, टपाली मतपत्रिका कक्ष, मतदान साहित्य नियोजन कक्ष, संगणक माहिती कक्ष, वाहन व इतर परवाना कक्ष, एक खिडकी कक्ष तहसील कार्यालयाच्या मतमोजणी जागेची पाहणी करण्यात आली. उमेदवारांना अर्ज घेण्यासाठी नामनिर्देशन पत्र व प्रतिज्ञापत्र वितरण कक्ष, अनामत रक्कम स्विकृती सुविधा कक्ष, नामनिर्देशन पत्र प्राथमिक तपासणी कक्ष, मतदार यादीतील नावे तपासणी सुविधा कक्ष स्थापन करण्यात आले.

नोडल अधिकारी यांची बैठक
शहरातील सौ.कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या जीमखाना हॉलमध्ये क्षेत्रीय अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नेमून दिलेली सर्व कामे वेळेत करावी, अंगणवाडी, आशा वर्करच्या मतदान केंद्रावर पाळणाघरासाठी आर्डरी तातडीने काढाव्यात, अशा सूचना केल्या. आढावा बैठकीत निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार आर.डी. पाटील, निवडणूक गटविकास अधिकारी के.पी.वानखेडे, राजेंद्र फेगडे, मुख्याधिकारी समीर शेख व नोडल अधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !