मुख्याधिकार्यांनी काम असे आदर्श करावे की शेवटी हत्तीवरून पाठवण्याची वेळ आमच्यावर यावी : वरणगावात नगराध्यक्ष सुनील काळे
वरणगाव नगरपरिषदेत मुख्याधिकारी राहुल भोये यांनी स्वीकारला पदभार
वरणगाव (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : वरणगाव शहराला एक इतिहास असून जो अधिकारी किंवा व्यक्ती चांगले काम करतो, त्याला शेवटी घोड्यावरून पाठवले जाते मात्र तुम्ही काम असे आदर्श करा की, शेवटी तुम्हाला हत्तीवरून पाठवण्याची वेळ आमच्यावर आली पाहिजे, असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी येथे केले.
वरणगाव नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून राहुल भोये यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या पदभार स्वीकारण्याच्या निमित्ताने नगरपरिषदेत आयोजित कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुख्याधिकार्यांचे स्वागत केले व यावेळी त्यांच्याकडून चांगल्या
धकारी राहुल भोये यांचे स्वागत व सत्कार करून समन्वयाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
काम करणार्याची ओळख कायम स्मरणात राहते
नगराध्यक्ष काळे पुढे म्हणाले की, जनतेसाठी विकास महत्त्वाचा आहे. विकासाचे काम नेमके कोणी केले, यापेक्षा कोणाच्या काळात शहरात सकारात्मक बदल झाला, हे जनतेच्या स्मरणात कायमचे कोरले जाते. वरणगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या विकासाच्या धावपळीला मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांची साथ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.



वरणगाव नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाल्यामुळे प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल आणि शहरातील विविध विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
लोकप्रतिनिधींसह कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती
कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे, गटनेत्या दीपाली माळी, सभापती श्रद्धा गायकवाड, वैशाली धनगर, भाग्यश्री सोनवणे, नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते नानाभाऊ चौधरी, ज्येष्ठ नगरसेविका माला मेढे, माधुरी हळदे, शबीनाबी मिर्झा, गटनेते इरफान सय्यद, नगरसेवक दीपेश पाटील, विनोद झोपे, शुभम जावळे यांच्यासह असंख्य जनसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नगरपरिषद कर्मचारी, दिव्यांग बांधव आणि नागरिक उपस्थित होते.
नागरिकाभिमुख काम करणार : राहुल भोये
नवीन मुख्याधिकारी राहुल भोये यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवून नागरिकाभिमुख कामकाज करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे वातावरण कार्यक्रमातून स्पष्ट झाले.वरणगावच्या विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करावे आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.