अत्याचारातून अल्पवयीन बालिका गर्भवती
जळगाव : अल्पवयीन मुलानेच 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यात उघडकीस आली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अत्याचारातून पीडीत बालिका पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुटुंब बाहेरगावी गेल्यानंतर अल्पवयी बालिकेसोबत गावातीलच अल्पवयीन मुलाने तीन दिवस अत्याचार केल्याने ही बालिका गर्भवती राहिल्याची बाब मुलीच्या वैद्यकीय तपासणीत समोर आली आहे. ही बाब कुणाला सांगितली तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिल्याचे पीडित मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.