विरोधकांनी तापवलेल्या राजकारणाच्या मुशित रोहिणीताई खडसे यांच्या सेवाकार्याचे बावनकशी सोने निरखेल : ईश्वर रहाणे


मुक्ताईनगर (11 नोव्हेंबर 2024) : विरोधकांनी अ‍ॅड.रोहिणीताई खडसे यांच्यावर कितीही टिका केली तरी जनसेवेचा ध्यास घेतलेल्या व नाथाभाऊ यांच्याकडून विकासाचा वारसा घेतलेल्या अ‍ॅड.रोहिणी ताई खडसे या निश्चितच विजयी होतील, असा विश्वास बोदवड बाजार समिती संचालक तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे यांनी व्यक्त केला

सूतगिरणीत चारशे महिलांना रोजगार
अ‍ॅड.रोहिणीताई खडसे यांचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी स्व कर्तृत्वातून आपल्याला मिळालेल्या पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांची सुरुवात मुक्ताईनगर तालुक्यात आदिशक्ती मुक्ताई सह सूतगिरणी चेअरमन म्हणून झाली. त्यांनी सूतगिरणीची धुरा आपल्या हाती घेतली तेव्हा सुतगीरणीचे काम अपुर्ण अवस्थेत होते. इमारती खंडहर प्रमाणे झालेल्या होत्या. कोणतीही मशिनरी नव्हती. अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी मेहनत घेऊन हा प्रकल्प पूर्णावस्थेत नेला. अद्ययावत मशीनरी आणल्या. आज रोजी सहकारी तत्वावर सुरू असलेली ती जिल्ह्यातील एकमेव सूतगिरणी आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी चारशे ते पाचशे महिला कार्यरत आहेत.

जिल्हा बॅकेला उर्जितावस्था
जळगाव जिल्हा बँक ही लयास जाण्याच्या स्थितीत आलेली होती. अशा वळी निवडणुका झाल्या. नवीन सर्वपक्षीय संचालक मंडळाने अ‍ॅ.रोहिणी खडसे यांची चेअरमन म्हणून निवड केली. चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी महत्प्रयत्नाने बँकेला उर्जितावस्थेत आणले. वायफळ खर्चाला कात्री लावली. बँकेला ऑडिट मध्ये ‘ड’ वर्गावरून ‘अ ’वर्गात आणले. बँकेचे संपूर्ण संगणकीकरण करून बँकेला इतर बँकांच्या स्पर्धेत आणून ठेवले. बँकेच्या ग्राहकांना सोयीसुविधा मिळवून दिल्या. एकंदरीतच जी बँक लयास गेली होती, तिला त्यांनी उर्जीतावस्थेत आणले.

अल्पशा मतांनी पराभव
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजपने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथराव खडसे यांना उमेदवारी नाकारली तेव्हा त्यांचेजागी अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. काही कारणांनी ड. रोहिणी खडसे यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. परंतु रोहिणी खडसे यांनी पराभवा नंतर खचून न जाता निकालाच्या दुसर्‍या दिवसापासून जिद्दीने कामाला लागल्या. त्यावेळी सुद्धा मतदारसंघात अ‍ॅड.रोहिणी खडसे या आ एकनाथराव खडसे कन्या असल्यामुळेच त्यांना आयते व्यासपीठ मिळाले अशी घराणेशाहीची टिका विरोधकांकडून करण्यात आली. परंतु त्यांनी या टिकेला न जुमानता गेल्या चार वर्षात मतदारसंघात समाजातील शेवटच्या घटका पर्यंत त्या गेल्या, त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या, त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात काढलेली ‘राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा’ ही राज्यात लक्षवेधी ठरली. महाराष्ट्रात सर्वत्र या यात्रेची चर्चा झाली. त्यांचे बघून अनेक नेत्यांनी अशा यात्रा त्यांच्या भागात काढल्या. या यात्रेत मतदारसंघातील सर्व 182 गाव खेडे वाड्या वस्त्यांवर जाऊन त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यांच्या सार्वजनिक समस्या जाणून घेतल्या त्या समस्या सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा केला व आजही करीत आहेत. त्यातील बहुतांशी प्रश्न मार्गी त्यांनी मार्गी लावले.

आपल्या मतदारसंघात रोहिणी खडसे यांनी शेवटच्या घटकापर्यंत जनसंपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना यश सुद्धा आले असल्याचे म्हणता येईल. त्यासाठी बोदवड,रावेर तालुक्यापासून मुक्ताईनगर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील सातपुड्यातील आदिवासी वाड्यापर्यंत त्या सतत दौरे करून नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होतात. नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी असो वा शेतकर्‍यांच्या इतर समस्या रोहिणी खडसे थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात हे चित्र सर्वसामान्यांना त्यांच्याबद्दल विश्वास देते.

जो व्यक्ती त्यांच्याकडे समस्या घेऊन येईल, ती समस्या सोडविण्याचा त्या प्रयत्न करतात. मग प्रसंगी आंदोलन करण्याची वेळ आली तरी, त्यांची तयारी असते. समस्या घेऊन आलेल्या व्यक्तिबरोबर प्रसंगी शासकीय कार्यालयात जाऊन सरकारी अधिकार्‍यांना धारेवर धरण्याची त्यांनी तयारी असते. हीच बाब त्यांना इतरांपासून वेगळी करते. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे प्रश्न असो की, शेतकर्‍यांचे पिक विम्याचा प्रश्न असो, शेतीच्या विज पुरवठ्याचा प्रश्न असो, शेती पंप चोरी जाण्याचा विषय असो, वेळोवेळी त्या आपल्या पदाधिकार्‍यां सोबत तहसील, पोलीस स्टेशन,विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय ,जिल्हाधिकारी कार्यालय गाठून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी तालुका पातळीवरून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची तयारी असते. सततच्या पाठपुराव्याने त्यांना समस्या मार्गी लावण्यात यश सुद्धा मिळून आल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. पोकरा योजनेचा प्रश्न असो की, कुंड धरणाची उंची वाढविण्याचा विषय असो आपल्या पाठपुराव्याने त्यांनी तो तडीस नेला आहे. हे मतदारसंघ्याच्या दृष्टीने आशादायी चित्र आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर त्यांनी काढलेला जन आक्रोश मोर्चा असो की महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या विरोधात काढलेला मोर्चा असो त्यातून त्यांचे संघटनात्मक कार्य ठळकपणे दिसून आले. समाजातील अपंग निराधार, अंगणवाडी सेविका, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, आदिवासी असो प्रत्येकाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या नंतर रोहिणी खडसे यांनी विदर्भ ,पश्चिम महाराष्ट्र, कोकण दौरा करून महिलांचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी महिन्यात मुंबई येथे त्यांच्या नियोजनात ‘ज्योत निष्ठेची सावित्रीच्या लेकीची’ हा भव्य महिला मेळावा पार पडला.
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात दौरे करून त्यांनी सभा, कॉर्नर सभा, घेऊन गाठीभेटी ,प्रचार रॅली द्वारे उमेदवारांचा प्रचार केला.

रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीने राज्यभरात केलेल्या आंदोलनाने राज्य शासनाला मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय काढावा लागला पिक विम्याचा प्रश्न असो कि शासकीय हमीभावात धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणे असो त्या सातत्याने प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत असतात. जनसेवेसाठी सातत्याने घेत असलेल्या मेहनतीमुळे आपल्या सततच्या कार्यमग्नतेमुळे,जनसामान्यांचे प्रश्न जाणून ते मार्गी लावण्याची असलेली तळमळ यामुळे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी विरोधकांनी तापवलेल्या राजकारणाच्या मूशीत रोहिणीताई खडसे यांच्या कर्तृत्वाचे व सेवाकार्याचे बावनकशी सोने निश्चितच निरखेल व त्या बहुमताने विजयी होतील, असा विश्वास बोदवड बाजार समितीचे संचालक ईश्वर रहाणे यांनी व्यक्त केला.


कॉपी करू नका.