भुसावळातील साईसेवक पिंटू कोठारी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
जनसेवेसाठी उदंड आयुष्य लाभण्याचे आबालवृद्धांसह मान्यवरांनी दिले आशीर्वाद
भुसावळ : दातृत्वाचा धनी म्हणून ओळख असलेल्या भुसावळातील उपक्रमशील नगरसेवक व साईसेवक पिंटू (निर्मल) कोठारी यांच्यावर मंगळवारी वाढदिवसानिमित्त दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मंगळवारी मध्यरात्रीपासून प्रभागातील नागरीकांसह मित्रमंडळी, कार्यकर्ते व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून तसेच सोशल मिडीयावरून शुभेच्छा व्यक्त करीत कोठारींना शुभाशीर्वाद देत जनतेच्या सेवेसाठी दीर्घायुष्याची कामना केली.



दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव
‘निर्मल’ दातृत्वाचे धनी असलेल्या नगरसेवक कोठारींवर मंगळवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून सोशल मिडीयावरून त्यांना शुभेच्छा देत उदंड आयुष्यासाठी कामना केल्या. प्रभागातील नागरीक व मित्र मंडळींनी मध्यरात्रीच केक कापून व औषध करून त्यांना आशीर्वाद दिले. शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील व्यापारी वर्गातूनही शुभेच्छांचा वर्षाव झाला.
माध्यमप्रेमींनी व्यक्त केले प्रेम
भुसावळातील दिव्य मराठीचे स्थानिक ब्युरो चीफ हेमंत जोशी, वरीष्ठ रीपोर्टर श्रीकांत सराफ, छायाचित्रकार कमलेश चौधरी तसेच भुसावळातील दैनिक जनशक्तीचे विभागीय कार्यालयप्रमुख गणेश वाघ, प्रथमेश भंवर यांनी प्रत्यक्ष भेटून कोठारी यांचे पुष्पगुच्छ देवून उदंड आयुष्यासाठी कामना केली. भुसावळकरांसह वंचित, उपेक्षित घटकांच्या मदतीसाठी व जनतेच्या उदंड सेवेसाठी दीर्घायुष्य लाभावे, अशी कामना याप्रसंगी मान्यवर पत्रकारांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

