सिलेंडर स्फोट प्रकरणातील महिलेने न्यायालयात मांडली आपबिती


जळगाव (12 डिसेंबर 2024) : इच्छादेवी चौफुलीपुढे राष्ट्रीय महामार्गालगत सिलेंडरमधुन वाहनात गॅस भरत असताना स्फोट झाला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेतील संशयितांनी जामीनसाठी अर्ज दाखल केले. यावर बुधवार, 11 रोजी न्या. एस.एन. राजुरकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असता दाळवाले परिवारातील उपस्थित महिलेने आपबिती मांडत न्यायालयाचे लक्ष वेधले.

दालवाले परिवारातील सदस्य उपस्थित
गुन्ह्यातील उमेश राजेंद्र शेजवड हा सिलेंडरमधुन वाहनात गॅस भरुन देत होता. तर या अवैध धंद्यासाठी आरिफ शेख रफिक हा गॅस सिलेंडरचा पुरवठा करत होता. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही संशयितांनी जामीन मिळावा,यासाठी न्यायालयात अर्ज सादर केले आहेत. आज न्या एस.एन. राजुरकर यांच्या न्यायालयात कामकाजाला सुरुवात झाली. दालवाले परिवारातील महिला व सदस्य न्यायालयात उपस्थित झाले होते.

महिलेतर्फे वकिलाने बाजु मांडली. तसेच जखमींचे फोटोग्राफ न्यायालयात दाखल केले. कुटुंबातील सदस्य भाजुन काही जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची पुनरावृत्ती होवू नये,अशा भावनेतून महिलेने व्यथा मांडली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड.सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले. संशयिताच्या जामीनावरील निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !