गुंतवुणकीच्या आमिषाने जळगावातील व्यापार्याला 48 लाखांचा चुना
जळगाव (12 डिसेंबर 2024) : गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायद्याचे सांगत एका व्यापार्याला 48 लाख 56 हजार रुपयांचा चुना लावण्यात आला. व्यापार्याची पुतणीचा पती तसेच दिर या दोघा नातलगांनी व्यावसायिकाला ठगविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
17 ऑक्टोंबर 2019 ते 11 मे 20232 दरम्यान संशयितांनी व्यापार्याला चुना लावला. फसवणुक झाल्याची खात्री झाल्याने व्यावसायिकाने तक्रार दिल्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. तपास पीएसआय प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.


